महाराष्ट्राची राज्यभाषा मायबोली मराठी विषयी सर्व माहिती देणाऱ्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्राची राज्यभाषा
मायबोली मराठी विषयी महत्वाचे अधिनियम, शासन निर्णय |
||
1 |
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम,
१९६४ : सदर
अधिनियमान्वये दि. २६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून “देवनागरी लिपितील मराठी भाषेचा” अंगीकार
करण्यात आला आहे. सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 5, महाराष्ट्र शासन राजपत्र -
दि. 11 जानेवारी, 1965 |
11-01-65 |
2 |
महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम,
1966 - या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा
वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करमहाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने)
नियम, 1966 - या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा
वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ण्यात आले आहे. शासन अधिसूचना क्र. ओएफएल- 1066 (एक)/एम, दि. 30
एप्रिल, 1966 |
30-04-66 |
3 |
दि ऑफिशियल लँग्वेज रिझोल्युशन, १९६८- सदर निर्णयान्वये देशाच्या विविध
भागातील लोकांना केंद्रशासनाशी संवाद साधणे सोपे व्हावे यासाठी हिंदी, इंग्रजी यासह स्थानिक जनतेच्या भाषेचाही
प्रशासकीय कामकाजात समावेश करण्याबाबतचे त्रिभाषा सुत्र पहिल्यांदाच स्विकारण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या
गृह विभागाचा शासन निर्णय
क्र.एफ/४/८/६५/ओएल,दि.१८ जानेवारी, १९६८ |
18-01-68 |
4 |
मनी ऑर्डर फॉर्म आणि लोकांद्वारे उपयोगात आणल्या जाणा-या
वेगवेगळ्या अर्जांचे नमुने प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत - सदर निर्णयाद्वारे
केंद्रीय कार्यालयात भरावे लागणारे
विविध अर्जांचे नमुने स्थानिक जनतेच्या सोयीसाठी प्रादेशिक भाषेत छापण्याच्या सूचना त्रिभाषा सुत्राच्या
अनुषंगाने देण्यात आल्या आहेत. शासन निर्णय क्र.७/९/६५/ओएल दि.२५.३.१९६८. |
25-03-68 |
5 |
अहिंदी भाषिक
राज्यामध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या कार्यालयात नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक
इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच स्थानिक लोकांना समजण्यासाठी प्रादेशिक भाषेतही असावेत. त्यांचा क्रम, (१) प्रादेशिक भाषा (२) हिंदी व (३) इंग्रजी असा असावा. तसेच सर्व भाषेतील लिपीतील अक्षरे सारखी असावीत,
अशी तरतूद या नियमान्वये करण्यात आली आहे. अशा प्रकारे त्रिभाषा सुत्राचा पुनरुच्चार या ज्ञापनान्वये
करण्यात आला आहे. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/५/७6-ओ.एल. (अे-1),दि.१८ जून, १९७७. |
18-06-77 |
6 |
ऑफिशियल लँग्वेज
रुल्स, १९७६ मधील ११ (3) च्या
तरतुदीच्या अनुषंगाने तसेच या संदर्भातील दि.१८ जून, १९७७ या नियमानुसार त्रिभाषा
सूत्राच्या अनुषंगाने सर्व केंद्र शासकीय कार्यालये व त्यांच्या अखत्यारीतील कार्यालये,
राष्ट्रीयीकृत बँका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांना प्रादेशिक भाषा, हिंदी व इंग्रजी
अशा तिन्ही भाषेत नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ.लावण्याचे निर्देश देण्याबाबत सूचना
या केंद्र शासनाच्या
ज्ञापनान्वये
देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/2/86-ओ.एल. (अे-1),दि.26 फेब्रुवारी,
1986. |
26-02-86 |
7 |
दि.१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असल्याने
१ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात
आला आहे. शासन निर्णय क्र.मभावा-१०९६/११६/ प्र.क्र.७/ ९६/२०
ब,दि.१० एप्रिल, १९९७. |
10-04-97 |
8 |
न्याय व्यवहारात
मराठीचा वापर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाकडून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरीता
रजिस्ट्रार जनरल, हाय कोर्ट, बॉम्बे यांनी या परिपत्रकाद्वारे सर्व दुय्यम न्यायालयांना आपल्या
स्तरावर ५० टक्के कामकाज मराठीतून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाचे परिपत्रक क्र. पी.0104/6, दि.09 डिसेंबर, 2005 |
09-12-05 |
9 |
न्याय व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा याकरिता दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे मराठीतून दाखल करण्याबाबतच्या
सूचना या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रक क्र. मभावा-2006/ 1099/ प्र.क.73/
06 - 20-ब, दि. 29.01.2007 |
29-01-07 |
10 |
न्याय व्यवहारात
मराठीचा वापर वाढावा याकरीता सर्व दुय्यम ता दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे
दावे मराठीतून दाखल करण्याबाबत- या शासन निर्णयाद्वारे दि.29.01.2007 च्या परिपत्रकाच्या
सूचनेमध्ये
अधिक स्पष्टता येण्याकरीता “जिल्हास्तरीय
व इतर दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे” असा बदल करण्यात आला आहे. शासन परिपत्रक क्र. मभावा-2006/1099/प्र.क.73 /06-20-ब, दि.
14.03.2007 |
14-03-07 |
11 |
महाराष्ट्रातील
सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यीक संस्था, हॉटेल्स, आहारगृहे इ. चे नामफलक मराठीत
लिहिण्याबाबत तरतूद उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या या परिपत्रकात करण्यात आली
आहे. उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे परिपत्रक क्र.बीएसई ०५/२००८/ प्र.क्र.८५१६/
कामगार-९,दि.३१ मे, २००८ |
31-05-08 |
12 |
शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन,
टंकलेखन, मुद्रण व संगणक इ. मध्ये एकरुपता आणण्यासाठी देवनागरी लिपी व वर्णामाला
या शासन निर्णयाद्वारे अद्ययावत करण्यात आली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या पत्त्यामध्ये देवनागरी लिपीतील
प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंक दर्शविण्यात आले आहेत. शासन निर्णय क्र.मभावा-२००४/ प्र.क्र.२५/२००४/२० ब,दि.६
नोव्हेंबर, २००९ |
06-11-09 |
13 |
फक्त महाराष्ट्रातील
केंद्रशासनाच्या कार्यालयात वेगवेगळ्या अर्जांचे नमुने, नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक
इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत सूचना त्रिभाषा सूत्राच्या
अनुषंगाने केंद्रशासनाच्या राजभाषा विभागाने या ज्ञापनान्वये दिल्या आहेत. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/०३/ २०१०-राभा (नीति-1, दि.१ जुलै,
२०१० |
01-07-10 |
14 |
मराठी भाषेशी संबंधित सर्व विषय एकत्रितपणे हाताळण्यासाठी एकच
स्वतंत्र विभाग असावा व मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाठी
राबवावयाच्या योजना, संबंधित संस्था या एकाच विभागाच्या कार्यक्षेत्राखाली असाव्यात
या सांस्कृतिक धोरणातील शिफारशीनुसार सन २०११ च्या आर्थिक वर्षापासून मराठी भाषा विभागाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्णय क्र. मभावा-2010/458/ प्र.क्र.95/(भाग-2)/20-ब,दि.
22 जुलै, 2010 |
22-07-10 |
15 |
साहित्य निर्मितीमध्ये
मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करण्यासाठी
निवड समिती शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
31-08-12 |
16 |
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ
पुरस्कारप्राप्त साहित्यिक कै.विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी
निवड समित शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
31-08-12 |
17 |
सर्व शासकीय
कार्यालयात तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
27-12-12 |
18 |
जेष्ठ कवी
वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा
गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
21-01-13 |
19 |
राज्यामध्ये दिनांक 1 मे ते 15 मे हा कालावधी मराठी भाषा संवर्धन
पंधरवडा म्हणून साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
12-04-13 |
20 |
शासन व्यवहारात
मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप
नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
20-08-14 |
21 |
राज्यात विकल्या
जाणाऱ्या प्रत्येक वस्तू, संगणकीय प्रणाली माहिती तंत्रज्ञान उपकरण, भ्रमणध्वनी इत्यादी
मध्ये राजभाषा मराठीचा वापर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
09-09-14 |
22 |
जेष्ठ कवी
वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा
गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
25-02-15 |
23 |
शासन व्यवहारात मराठीचा वापर विविध विभागातील नस्त्यावरील टिप्पण्या,
शेरे, अभिप्राय, अनौपचारिक संदर्भावरील टिप्पण्या, बैठकांचे कार्यवृत्त, अहवाल तसेच
निविदा, जाहिराती इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
28-04-15 |
24 |
दि. १ मे ते
१५ मे या कालावधीऐवजी
”मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत साजरा
करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र.मभापं २०१५/ प्र.क्र.७०/भाषा-२ दि.२२ जुलै, २०१५ |
22-07-15 |
25 |
महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2015 - याद्वारे
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 यामध्ये “महाराष्ट्र
राज्याची राजभाषा मराठी असेल”
अशी सुधारणा करण्यात आली आहे. सन
2015 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.36, महाराष्ट्र शासन राजपत्र दि.21 ऑगष्ट 2015 |
21-08-15 |
26 |
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दि. १५ ऑक्टोबर
हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत........ शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
14-10-15 |
27 |
मराठी भाषा
विभाग व अधिपत्याखालील कार्यालयांकडून आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या
/ समारंभांच्या वेळी मान्यवर व्यक्तींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्या ऐवजी पुस्तक
भेट देऊन करण्याबाबत..... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
15-10-15 |
28 |
दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी, 2016 या कालावधीत मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
05-12-15 |
29 |
मराठी भाषा
संवर्धन पुरस्कार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
18-02-16 |
30 |
मराठी भाषा
विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची
विक्री अधिकृत वितरकांमार्फत करण्यास व शासकीय प्रकाशनांवर 40 सवलत देण्यास मान्यता
देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
15-03-16 |
31 |
शासन व्यवहारात मराठीचा वापर - मंत्रालयीन विभागांची संकेतस्थळे
मराठीतून करण्याबाबत. शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
27-01-17 |
32 |
माजी राष्ट्रपती
स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन
म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
03-10-17 |
33 |
केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची
कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा
वापर करणेबाबत. शासननिर्णयाची
प्रत डाऊनलोड करा |
05-12-17 |
34 |
केंद्रशासनाच्या
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे
, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. मध्ये ज्या बाबींमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषेचा वापर करावयाचा आहे त्या सर्व बाबी नमूद करुन त्यामध्ये
मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या सूचना एकत्रितरित्या
या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रक क्र.मभावा-२०१६/ प्र.क्र.८२/भाषा २,दि.५ डिसेंबर, २०१७ |
05-12-17 |
35 |
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
07-05-18 |
36 |
महाराष्ट्र
राजभाषा (वर्जित प्रयोजने)
नियम, १९६६, दि.३० एप्रिल, १९६६ अन्वये या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता, सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे
दि.१ मे, १९६६ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.
तसेच दि.१ मे, १९८५ पर्यंत वर्जित प्रयोजने वगळता, सर्व प्रशासकीय कार्यालयातील कामकाजात
मराठीचा वापर १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने या शासन निर्णयान्वये सर्व मंत्रालयीन
विभाग व त्याअंतर्गत प्रशासकीय कार्यालये, शासन अंगीकृत व्यवसाय, शासकीय उपक्रम यांना
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर १०० टक्के करण्याबाबत सूचना पुन:श्च एकत्रित
स्वरुपात देण्यात आल्या आहेत. तसेच
प्रशासनात वारंवार वापरल्या जाणा-या इंग्रजी शे-यांसाठी पर्यायी मराठी भाषेतील संक्षिप्त
शे-यांची लघुपुस्तिका देखील शासन निर्णयासोबत जोडली आहे. शासन परिपत्रक क्र.मभावा-२०१८/ प्र.क्र.४७/भाषा २ दि.७ मे, २०१८. |
07-05-18 |
37 |
मराठी भाषा
संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा |
12-12-18 |
38 |
राज्य मराठी
विकास संस्था, मुंबई यांचेमार्फत “पुस्तकांचे
गाव” भिलार ही योजना कार्यान्वित करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.... |
03-10-19 |
39 |
मराठी भाषा
विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची विक्री खाजगी वितरकांमार्फत
करण्यास व शासकीय प्रकाशनांवर ४० टक्के सवलत देण्यास मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा..... |
03-10-19 |
40 |
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करण्याबाबत दिनांक
२९ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत... शासन परिपत्रक डाऊनलोड करा |
01-07-20 |
41 |
महाराष्ट्र
शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२० |
09-03-20 |
42 |
2013 |
|